Sunday, October 26, 2025
Homeयोजनानोकरी12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी...

12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी भरती अन्…

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी (NTPC) भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

 

संबंधित भरती ही 3000 हून अधिक पदांसाठी जाहीर करण्यात आली असून 12 वी उत्तीर्ण उमेदवार यामध्ये सहभागी होऊ शकतात.

 

रेल्वे भरती बोर्ड (RRB) च्या एनटीपीसी (NTPC) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2025 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार अर्ज करण्यासाठी www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट जाऊन अर्ज करू शकतात.

 

काय आहे पात्रता?

 

रेल्वे एनटीपीसी (NTPC)च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50 टक्के गुणांसह 12 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच, एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील आणि अपंग उमेदवारांना गुणांची अट लागू होणार नाही. याव्यतिरिक्त, उमेदवारांचं इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द आणि हिंदीमध्ये प्रति मिनिट 25 शब्द टाइपिंग स्पीड असणं आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

वेतन: या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 25,500 रुपये वेतन दिलं जाईल. याव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते सुद्धा मिळतील.

 

वयोमर्यादा

 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

वेतन: या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 25,500 रुपये वेतन दिलं जाईल. याव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते सुद्धा मिळतील.

 

कसा कराल अर्ज?

 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

2. त्यानंतर, अर्ज करण्यासाठी आधी उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.

3. आता मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने लॉगिन करा आणि मागितलेली आवश्यक माहिती भरा.

4. नंतर, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, प्रवर्ग आणि पत्ता अशी वैयक्तिक माहिती भरा.

5. डॉक्यूमेंट्सच्या सेक्शनमध्ये जाऊन पासपोर्ट साइझ फोटो, सही सुद्धा अपलोड करा.

6. आता भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट सुरक्षितरित्या ठेवा.

7. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -