Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रकोणत्या जि. प.मध्ये कोणत्या पक्षाला यश; कोणी मारली बाजी; वाचा संपूर्ण निकाल!

कोणत्या जि. प.मध्ये कोणत्या पक्षाला यश; कोणी मारली बाजी; वाचा संपूर्ण निकाल!

महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.

 

त्यात भाजपने सर्वाधिक 7 जिल्हा परिषदा आपल्या खिशात घातल्या आहेत. तर सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदा मिळाल्या आहेत.

 

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकाही जिल्हा परिषदेत आपली चमक दाखवता आला नाही. शरद पवार गटाला 1 जिल्हा परिषद मिळाली आहे. चला तर जि.प. नुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाला अन् कोणाची सत्ता आली याचा आढावा घेऊया…!

 

1 – रत्नागिरी जिल्हा परिषद

 

पक्ष जागा

भाजप 02

शिवसेना 36

राष्ट्रवादी काँग्रेस 4

शिवसेना ठाकरे गट 1

काँग्रेस 0

राष्ट्रवादी शरद पवार गट 0

मनसे 1

हे ही वाचा :धाराशीवमध्ये एका मताने फिरवलं नशीब! ठाकरेंचा हा उमेदवार विजयी

 

2 – सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 21

शिवसेना 08

शिवसेना ठाकरे गट 02

काँग्रेस 00

राष्ट्रवादी काँग्रेस 00

अपक्ष 05

3 – पुणे जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 8

शिवसेना 5

राष्ट्रवादी 43

शरद पवार गट 1

ठाकरे गट 7

काँग्रेस 0

4 – सातारा जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 32

शिवसेना 10

राष्ट्रवादी 18

ठाकरे गट 0

काँग्रेस 0

इतर 0

5 – सांगली जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 18

राष्ट्रवादी अजित पवार 7

काँग्रेस 11

शिवसेना शिंदे गट 07

राष्ट्रवादी शरद पवार गट 15

शिवसेना ठाकरे गट 01

जनसुराज्य 01

रयत क्रांती(सदाभाऊ खोत) 01

हे ही वाचा : पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरेंची बिनविरोध निवड, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

 

6 – कोल्हापूर जिल्हा परिषद

 

पक्ष :जागा

भाजप 12

शिवसेना (शिंदे) 7

राष्ट्रवादी 16

काँग्रेस 13

शिवसेना (ठाकरे) 1

जनसुराज्य 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना 1

शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट 4

7 – सोलापूर जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 37

शिवसेना 7

राष्ट्रवादी 9

ठाकरे गट 0

काँग्रेस 0

इतर 3

8 – छत्रपती संभाजीनगर

 

पक्ष : जागा

भाजप 22

शिवसेना 19

शिवसेना UBT 8

NCP 2

NCP SP 1

काँग्रेस 1

वंचित 00

एमआयएम 00

अपक्ष 7

9 – परभणी जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 21

शिवसेना 05

शिवसेना ठाकरे गट 03

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 11

काँग्रेस 03

इतर 00

10 – धाराशिव जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 12

शिवसेना शिंदे गट 12

शिवसेना ठाकरे गट 5

राष्ट्रवादी काँग्रेस 5

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 0

काँग्रेस 2

समाजवादी पक्ष 1

इतर 4

11 – लातूर जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

काँग्रेस : 21

भाजप : 18

NCP अजित पवार : 11

शिवसेना (शिंदे) : 02

NCP शरद पवार : 01

मनसे : 01

अपक्ष : 02

शिवसेना (उबाठा) : 00

वंचित : 00

12 – रायगड जिल्हा परिषद

 

पक्ष : जागा

भाजप 12

शिवसेना 16

राष्ट्रवादी काँग्रेस 16

शिवसेना ठाकरे गट 5

काँग्रेस 1

शेकाप 0

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा!

 

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने मरगळ झटकताना जोरदार मुसंडी मारली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 20 जागा जिंकत मिनी मंत्रालयात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा कडवी झुंज दिली असून त्यांना 15 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 13 जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनसुराज्य पक्षाला 5 जागा मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडी प्रणित राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला चार जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.

 

हे ही वाचा :मतमोजणीपूर्वीच महायुती 27 जागांवर विजय! बिनविरोध विजेत्यांची यादी

 

सांगोला पंचायत समितीवर शेकापचा झेंडा

 

सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातील सांगोला विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. पक्षाने पंचायत समितीच्या 14 पैकी 9 जागा जिंकून पंचायत समितीवर सत्ता मिळवली. पंचायत समिती ताब्यात येताच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे.

 

निर्मला नवले यांना धक्का

 

शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या कारेगाव-कान्हूर मेसाई गणातून रिंगणात उतरल्या होत्या. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख असूनही, मतपेटीत मात्र त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही.भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी नवले यांचा 300 मतांनी पराभव केला.

 

सून विजयी होताच देवराम लांडेंचा ‘लंगोट स्टाईल’ जल्लोष

 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आपल्या सुनेच्या विजयाचा आनंद अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांच्या सून मोनाली अमोल लांडे या घड्याळाच्या चिन्हावर जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्यानंतर देवराम लांडे थेट लंगोट घालून रस्त्यावर उतरले आणि डीजेच्या तालावर नाचत जल्लोष केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -