रूईच्या ‘त्या’ बेपत्ता बहीण-भावाचे मृतदेह निरा कालव्यात सापडले


अंदोरी ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई(rui) येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा (४ वर्षे) मुलगा व (अडीच वर्षे) मुलगी ही बहीण- भाऊ असणारी लहान मुले काल (शनिवार) सकाळी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली होती.


या नंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला होता. दरम्यान रूईच्या बेपत्ता बहीण-भावाचे मृतदेह आढळून आले. आज (रविवार) सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे प्रेत आढळून आले, तर ऐश्वर्या या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरे बु ता. खंडाळा गावच्या हद्दीत सोळस्कर वस्तीजवळ पोलिसांना मिळून आला.


पोलिसांनी दोन्ही मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.

Leave a Reply

Join our WhatsApp group