इंग्लिश मीडियम शाळा 15 फेब्रुवारीआधीच सुरू करणार

ताजी बातमी ऑनलाइन टीम

दिवसांपासून कोरोनाचे (Coronavirus) रूग्ण प्रचंड वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवस झाले शाळेची घंटा वाजली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा शाळेला टाळं लागलं. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन संघटनेकडून आपल्या शाळा (Pune English Medium School) पालकांच्या संमतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा सुरू करुन काही दिवस झाले नाही तोवर पुन्हा शाळेला टाळं लागलं. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेय. विद्यार्थी शाळा सोडून सर्व ठिकाणी जात आहेत. त्यामुळे शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. त्याचबरोबर मागील दोन वर्षामध्ये झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करावा. याच अनुषंगाने पालकांनी व संस्थाचालकांनी कोरोना बाबतचे नियमांचे कडेकोट पालन नियमितपणे ऑफलाईन शाळा (Offline
School) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणतात, “कोरोना विषाणू हा आता आपल्याबरोबर हवेत असणारच आहे. आता त्याला बरोबर घेऊन जगणे शिकावे लागणार आहे. जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवणे चुकीचे ठरेल. तसेच सध्या केवळ 60 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. बाकी 40 टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा लागणार असल्याचं ते म्हणाले.

Join our WhatsApp group