कर्नाटकातील SDM मेडिकल कॉलेज सील, 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कर्नाटकातील धारवाडमध्ये (Karnataka, Dharwad) एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SDM college of Medical Sciences) आज 66 हून अधिक विद्यार्था कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने कॉलेज आणि वसतिगृह सील केले गेले. या सर्व 66 विद्यार्थ्यांचं करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोसघेऊन लसीकरण पूर्ण झालेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एसडीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे तेव्हा लक्षात आले जेव्हा प्रोटोकॉल म्हणून कॉलेज कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली. एकूण 400 विद्यार्थ्यांपैकी, 300 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी केली गेली होती.

जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपायुक्तांच्या आदेशानंतर, महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत आणि सर्व वर्ग निलंबित करण्यात आले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर वसतिगृहातच उपचार केले जातील, असे धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी सांगितले.

Open chat
Join our WhatsApp group