Friday, April 26, 2024
HomeइचलकरंजीIchalkaranji News ड्रेनेज तुंबण्याच्या वाढत्या प्रकारामुळे मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर : नागरिकांचे आरोग्य...

Ichalkaranji News ड्रेनेज तुंबण्याच्या वाढत्या प्रकारामुळे मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, सॅनिटरी नॅपकीन, गुटख्याच्या रिकाम्या पुड्या यासह मातीचा गाळाच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील अनेक ड्रेनेज तुंबून (चॉकअप) मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर ड्रेनेज देखभाल दुरूस्ती करणाऱ्या कामगारांकडे चॉकअप काढण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार आव्हान करूनही नागरिक  त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ड्रेनजचे चॉकअप  वाढत असल्याचे दिसून येत आहे.

इचलकरंजी शहराच्या निम्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी अंतर्गत ड्रेनेजची व्यवस्था केली आहे. शहरातून निर्माण होणारा मैला टाकवडेवेस येथे असलेल्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. सदरची ड्रेनेज व्यवस्था १५ ते २० वर्षापूर्वीची आहे. सदरची पाईपलाईन ही अरूंद आहे. या ड्रेनेजमध्ये मोठ्या प्रमाणात टाकावू साहित्य साचून ड्रेनेज चॉकअप होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील शाहू हायस्कूल परिसर तसेच गावभाग परिसर, वंदे मातरम् ग्राऊंड परिसर आदी भागातील ड्रेनेज चॉकअप होवून मैलायुक्त सांडपाणी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर पसरवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरचे ड्रेनेज चॉकअप काढण्यासाठी गेलेल्या कामगारांपुढे एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणच्या ड्रेनेज हे मद्याच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, गुटख्याच्या रिकाम्या पुड्या, सॅनिटरी नॅपकीन, तसेच गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीचा गाळ ड्रेनेच्या पाईपलाईनमध्ये अडकून चॉकअप होत आहे. त्यामुळे कामगारांना चॉकअप करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनीही योग्य ती काळजी घेवून ड्रेनेज पाईपलाईनमध्ये टाकावू पदार्थ टाकू नयेत असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -