कोल्हापूर : एनआयएने चौकशी करून ‘त्या’ भावांना सोडले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील अंबाईनगरमध्ये राहणाऱ्या इर्शाद व अलताफ शेख या सख्ख्या भावांची ‘एनआयए’च्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापुरात एनआयएच्या पथकाने आज (दि.३१) छापेमारी केली होती. यामुळे खळबळ उडाली होती. अखेर चौकशीअंती त्या दोघांची सुटका करण्यात आली आहे.एनआयए च्या पथकाने चौकशीसाठी त्या दोघांना ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. एनआयए च्या पथकाने कोल्हापूर येथे नेऊन त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, त्यांच्या घरासमोर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इर्शाद व अलताफ शेख यांना एनआयएच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या घटनेवरून संतप्त झालेल्या जमावाने इरशाद याच्या लब्ब्याक इमदाद फाउंडेशनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.

Join our WhatsApp group