Friday, January 16, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : राजेंद्रनगरात कॉलेज तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर : राजेंद्रनगरात कॉलेज तरुणीची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील कॉलेज तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी सचिन शिवशरण (वय 17) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
बारावी उत्तीर्ण झालेल्या साक्षीने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सकाळी दहा वाजता साक्षी आई, बहीण व लहान भावांशी गप्पा मारून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीय, नातेवाईकांनी आक्रोश केला.

राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -