कोल्हापूर : कोडोलीत २ लाख ६५ हजाराचा तंबाखू, गुटखा जप्त ; एकास अटक

कोडोली ता. पन्हाळा येथील हॉटेल यश डायनिंग समोरील रोडवर असणाऱ्या ठिकाणी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या सुंगधी सुपारी, तंबाखू तसेच गुटखा असा २ लाख ६५ हजार २५६ रू. चा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली.

कोडोली येथे आज गुरुवारी सकाळी १०.१५ वा. ही कारवाई सुरू झालेवर सर्वच मुद्देमाल ताब्यात घेतलेवर अन्न व औषध प्रशासन कोल्हापूरचे अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश मल्हारी लवटे यानी फिर्याद दिल्यावर कोडोली पोलीस ठाण्यात सांयकाळी ६ वा.अन्न सुरक्षा अधिनियम कलम 59 व भा.द.वि.स. कलम 328,188,272,273 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी भगतसिंग गल्ली कोडोली ता. पन्हाळा येथील नजीर रमजान कलावंत यास कोडोली पोलीसानी अटक केली आहे.

राज कोल्हापूरी पानमसाला, विमल पानमसाला, राज जर्दा सुगंधीत तंबाखू, व्ही .१ सुगंधीत तंबाखू, एम .४ रॉयल जाफराणी जर्दा, आर एन सुगंधीत सुपारी, एम सुगंधीत तंबाखू , राजू इलायची सुपारी, एम सुगंधीत तंबाखू, आर. एम.डी. पान मसाला, उषा नं . 360 सुगंधीत तंबाखू, मिराज सुपर स्वदेशी सुगंधीत तंबाखू व टेम्पो असा एकूण २ लाख ६५ हजर २५६ रू. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड, पो.ना. यादव अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp group