भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सलमानच्या चाहत्यांचा आनंद होणार द्विगुणित!

2022 मध्ये बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर खूप दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. आता ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर प्रेक्षक आता चांगल्या चित्रपटांची प्रतिक्षा करत आहेत. या ब्लॉक बस्टर चित्रपट बोलायचं झालं तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं नाव घेतलं नाही तर ती लिस्ट अर्धवट आहे. या वर्षाच्या अखेरीस सलमानचा ‘किसी का भाई किसी का जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता आणि तो पाहिल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची तारिख आता समोर आली आहे.

दिग्दर्शक फरहाद सामजीचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच ज्या दिवशी असेल त्याच दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचा ट्रेलर 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, आधी या चित्रपटाचं नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असं होतं. मात्र, नंतर ते बदलून ‘भाईजान’ करण्यात आलं. अखेर ऑगस्टमध्ये त्याचे शीर्षक ‘किसी का भाई किसी की जान’ असे ठरवण्यात आले. सप्टेंबरच्या सुरुवातीला सलमाननं ‘किसी का भाई किसी की जान’ मधील त्याचा फर्स्ट लूकचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याची स्टाइल पाहून चाहते संतापले होते.

या व्हिडिओमध्ये सलमान लांब केस आणि स्वॅगमध्ये दिसत होता. हा व्हिडिओ लडाखमध्ये शूट करण्यात आला असून त्यात सलमान एकटा फिरताना आणि स्वॅगमध्ये दिसत आहे. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये सलमानच्या डॅशिंग लूकसह, बॅकग्राऊंड म्युझिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खानसोबत दाक्षिणात्य कलाकार व्यंकटेश, जगपती बाबू आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शहनाज गिलचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.

Join our WhatsApp group