Ananya Panday आणि Aditya Roy Kapur चे खरंच रिलेशनशीपमध्ये आहे का?

बॉलिवूड कलाकार यांच्या अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा या नेहमी होत असतात. या कलाकारांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा चांगल्याच रंगतात. अशामध्ये सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी अनन्या पांडे अभिनेता ईशान खट्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अनन्या पांडे अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapur) रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या दोघेही दिवाळी पार्टीमध्ये एकाच कलरच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसले. त्याचा व्हिडिओ (Ananya Pandey And Aditya Roy Kapur Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनन्या पांडेने प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ मध्ये तिच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा करताना सांगितले होते की, ती आदित्य रॉय कपूरला हॉट समजते. यावेळी करण जोहरनेही दोघे एकत्र चांगले दिसत असल्याचे देखील म्हटले होते. आदित्य आणि अनन्या यांची जोडी देखील खूपच सुंदर दिसते. अशामध्ये सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार दिवाळी पार्ट्या सुरु आहेत. या पार्ट्यांमध्ये आदित्य आणि अनन्या वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये उपस्थिती लावताना दिसत आहेत. अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकताच दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. या पार्टीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये अनन्या आणि आदित्य गप्पा मारताना दिसले होते.

गुरुवारी रात्री फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये आदित्य आणि अनन्या एका खास अंदाजमध्ये पाहायला मिळाले. सर्वांच्या नजरा या कपलच्या ड्रेसिंग स्टाईलकडे खिळल्या होत्या. दोघांनी मॅचिंग रंगाची ड्रेसिंग केली होती. आदित्यने ब्लॅक कलरचा कुर्ता घातला होता. तर अनन्या पांडेने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. दोघेही या ड्रेसिंगमध्ये खूपच क्युट दिसत होते. यावेळी कॅमेऱ्यासमोर दोघेही मस्ती करताना दिसते त्याचसोबत दोघांनी अनेक किलर पोझ दिल्या.

Join our WhatsApp group