शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पुढील चार दिवस पाऊस राज्यात नसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पुढील चार दिवसानंतर पाऊस होऊ शकतो. एल निनोचा प्रभाव राज्यातील मॉन्सूनवर बघायला मिळतोय. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. राज्यात अपेक्षित पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला नाही. त्यातच सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. मध्य उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याला समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. राज्यात काही भागात स्थिती भयंकर आहे.
दुष्काळाचे मोठे सावट राज्यावर आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस पाऊस नसणार असल्याचा अंदाज दिला. जुलै महिन्यात राज्यात पाऊस चांगला झाला. चार दिवसानंतर राज्यात पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. काही भागात स्थिती अत्यंत भयंकर असून धरणे कोरडी पडली आहेत. पाणी पातळी घटताना दिसत आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. 40 ते 45 दिवसापासून पाऊस नसल्याने पीक सुकत असून शेतकऱ्याने लागवडीसाठी केलेला खर्च देखील वाया गेल्याचं पत्रात केलं नमूद. येत्या काळात उदरनिर्वाह आणि कर्जफेडीचा प्रश्न गंभीर होणार असल्याने परभणी आणि जालना जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची केली मागणी.
पिक विमा दुष्काळी सवलती व शासनाच्या इतर सर्व मदतीचा लाभ तात्काळ देण्याची पत्रातून केली मागणी. खरीपातील महत्त्वाचे पीक असलेल्या बाजरीवरही पावसाअभावी संकट ओढावले असून पीक करपण्यास सुरुवात झाली आहे. पिकांची पेरणी होऊन जवळपास दोन महिने झाले असतानाही पुरेसा पाऊस न झाल्याने वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी बाजरीला कणसे आली असली तरी कणसांमध्ये दाणे भरलेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
