प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या वादात एकजण लोखंडी खुरप्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाला. जितेंद्र तुकाराम वडर (वय ३६ रा. सिध्दार्थनगर वडर गल्ली चंदर) असे जखमीचे नांव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विशाल प्रभाकर कांबळे (वय ३५ रा. सिध्दार्थनगर वडर गल्ली चंद्रर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित एकाच परिसरात राहण्यास असून फिर्यादीची पत्नी व संशयित यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. अशातब ५ मे रोजी फिर्यादीची पत्नी व संशयित दोघे बोलत असताना मिळून आल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला, त्यातूनच पत्नी माहेरी निघून गेली.
१३ सप्टेंबर रोजी फिर्यादी आणि संशयित यांच्यात पुन्हा बाद होऊन त्यामध्ये विशाल याने जितेंद्र याच्यावर लोखंडी खुरप्याने वार केला. या हल्ल्यात जितेंद्र गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सरू आहेत. तर विशाल हा पळून गेला आहे.
