Monday, July 28, 2025
Homeयोजनानोकरीएनटीपीसी' परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक

एनटीपीसी’ परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक

रेल्‍वे भरती बोर्ड (आरआरबी) च्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘एनटीपीसी’ परीक्षा निकालात घोटाळा झाल्‍याचा आरोप करत परीक्षार्थींनी केला हाेता. हा निकाल रद्‍द करा अशी मागणी करत शेकडाे परीक्षार्थींनी बिहारमध्‍ये बक्‍सर, मुजफ्‍फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्‍ये रेल रोको आंदोलन केले. पश्‍चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. पोलिसांवर दगडफेकही केली. गेली दोन दिवस सुरु असलेल्‍या या आंदोलनामुळे बिहारमधील रेल्‍वे सेवा कोलमडली आहे.

‘आरआरबी’च्‍या वतीने ‘एटीपीसी सीबीटी’ १ परीक्षा डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीमध्‍ये आयोजित केली हाेती. यासाठी १ कोटी ४० लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली हाेती. या परीक्षाचा निकाल १४-१५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाला. या निकालात घोटाळा झाला आहे असा आरोप करत परीक्षार्थींकडून करण्‍यात आला. तसेच सोशल मीडियावरुनही निकालातील गोंधळावर परीक्षार्थींनी आपली मते व्‍यक्‍त केली. मंगळवारी रात्री बिहारमधील परीक्षार्थी रेल्‍वे मार्गांवर उतरले. अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन सुरु केले. पश्‍चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. या पॅसेंजचे इंजिनच्‍या मागील बाजूस आग लागली. यावेळी मोटारमनने प्रसंगावधान राखत ही आग बुझवली. त्‍यामुळे आग पसरली नाही. मात्र इंजिनचा आतील भाग आगीत भस्‍मसात झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -