Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसीबीएसईची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, जाणून घ्या अधिक माहिती!

सीबीएसईची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, जाणून घ्या अधिक माहिती!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या (CBSE board Exam 2022) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. 26 एप्रिलपासून सीबीएसईमार्फत 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. सीबीएसईची या शैक्षणिक वर्षातील सेमिटर -2 ची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या आधी सीबीएसई बोर्डाकडून अधिकृत वेबसाईटवर (CBSE Website) विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे हॉल तिकीट जारी करण्यात येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सेमिस्टर- 1च्या परीक्षेमध्ये असणारे रोल नंबर सेमिस्टर -2च्या परीक्षेसाठी देखील सारखाच असणार आहे. सीबीएसई बोर्डातर्फे लवकरच सेमिस्टर -2 साठीचे हॉल तिकीट जारी करण्यात येणार आहे. पण हॉल तिकीट कधी मिळणार याची तारीख अद्याप बोर्डाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अधिक आणि नवीन माहितीसाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल. सेमिस्टर – 2 परीक्षेचे हॉल तिकीट जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट देऊन हॉल तिकीट डाऊनलोड करावे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फक्त वेबसाईटवरच नाही तर त्यांच्या शाळेमध्ये देखील हॉल तिकीट मिळणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे CBSE ने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीबीएसईने सेमिस्टर – 2 ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -