Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनSonam Kapoor च्या घरी मोठी चोरी, चोरट्यांनी 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि...

Sonam Kapoor च्या घरी मोठी चोरी, चोरट्यांनी 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम केली लंपास!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या घरामध्ये मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सोनम कपूरच्या दिल्ली येथील घरामध्ये ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी सोनमच्या घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची घटना लक्षात येता याप्रकरणी सोनम कपूरच्या सासूने दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कपूरच्या दिल्लीतील घरामध्ये चोरीची घटना घडली आहे. सोनमच्या घरातील 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. सोनमच्या घरामध्ये काम करणाऱ्या 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम पुरावे गोळा करत आहे. आतापर्यंत आरोपींची काहीच माहिती मिळालेली नाही. तुघलक रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने दिल्ली पोलिसांनी ते गांभीर्याने घेतले आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार केली आहेत.

नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरचे घर दिल्लीतील 22 अमृता शेरगिल मार्ग येथे आहे. याठिकाणी तिची सासू सरला आहुजा, त्यांचा मुलगा हरीश आहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला अहुजा यांनी घरातील कपाटामध्ये दागिने आणि पैसे ठेवले होते. त्यांनी हे दागिने आणि पैसे दोन वर्षांपूर्वी तपासून व्यवस्थित ठेवले होते. पण 11 फेब्रुवारीला कपाट तपासले असता. दागिने आणि पैसे कपाटात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. हे प्रकरणा हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी याची माहिती गुप्त ठेवली होती. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फूटेजचा तपास घेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -