Wednesday, July 23, 2025
Homeआरोग्ययेथे मिळणार नि:शुल्क 'बूस्टर डोस' जाणून घ्या

येथे मिळणार नि:शुल्क ‘बूस्टर डोस’ जाणून घ्या

दिल्ली सरकारच्या वतीने येत्या काळात सरकारी रुग्णालयांमध्ये नागरिकांना नि:शुल्क बूस्टर डोस लावण्यात येतील,अशी माहिती मंगळवारी राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. कोरोना विरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांनाच खबरदारी म्हणून डोस लावण्यात येईल.

दुसरा डोस घेवून ९ महिने पुर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना बूस्टर डोस लावण्यात येईल, असे जैन यांनी स्पष्ट केले. राजधानीत सोमवारी १०० हून अधिक खासगी रुग्णालयात नागरिकांना बूस्टर डोस लावण्यात आले. विशेष म्हणजे तरुण मोठ्या प्रमाणात समोर येवून  डोस घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिल्लीतील खासगी रुग्णालयांमध्ये ३८६ रुपये किंमतीत डोस लावले जात आहे. कोव्हिशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे दर सारखेच आहेत. केंद्र सरकारच्या लसीकरण अभियानाअंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील सर्वांसाठी १० एप्रिल पासून डोस लावण्यात सुरूवात करण्यात आली आहे. हे डोस केवळ खासगी रुग्णसालयात उपलब्ध होतील.

पंरतु, दिल्ली सरकारने सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हे डोस नि:शुल्क उपलब्ध करवून देण्याची घोषणा केल्याने लसीकरणाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. दर एका डोसवर येणारा ३८६ रुपयांच्या खर्चाचे वहन राज्य सरकार करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -