Wednesday, July 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: खासदार संभाजीराजे म्हणाले, तीन मे नंतर माझी वेगळी दिशा!

कोल्हापूर: खासदार संभाजीराजे म्हणाले, तीन मे नंतर माझी वेगळी दिशा!

ताजी बातमी ऑनलाइन टीम

माझ्या खासदारपदाची मुदत तीन मे रोजी संपणार आहे. त्यानंतर माझी निश्चितपणे वेगळी दिशा असणार आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच अशी माझी भूमिका राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवारी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.



माझ्या खासदारपदाची मुदत तीन मे रोजी संपणार आहे. त्यानंतर माझी निश्चितपणे वेगळी दिशा असणार आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच अशी माझी भूमिका राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, मंगळवारी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी (media) बोलताना ही माहिती दिली.



यावेळी संभाजी राजे म्हणाले, मतदान करणे सर्वांचा अधिकार आहे. बराच विचार करून मी आज मतदान केले. त्यासाठी मला ३० सेकंदांचा वेळ लागला. सर्वसामान्य, गरीबांसाठी मी नेहमी संघर्ष असतो. त्याअंतर्गत मी उपोषण केले. सामाजिक क्षेत्रात माझे प्रामाणिकपणे काम सुरू आहे. त्यावर कुणी, काय, बोलावे, कोणती भूमिका घ्यावी यावर मला भाष्य करायचे नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदारपदाची मुदत संपल्यानंतर माझी निश्चितपणे वेगळी दिशा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणही केले होते. ठाकरे सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं होतं. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना महाराष्ट्रात मोठा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची त्यांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा या जागेवर संधी मिळणार का? हेच पाहावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -