ताजी बातमी ऑनलाइन टीम
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. आरसीबीचा (RCB) कर्णधार डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची धावसंख्या ५ षटकात १ बाद २५ आहे.
आज CSK चा 200 वा IPL सामना आहे. चेन्नईसाठी हा आयपीएलचा हंगाम खूप वाईट गेला आहे. या संघाने आतापर्यंतचे चारही सामने गमावले आहेत. रवींद्र जडेजाचा संघ आज हा पराभवाचा सिलसिला तोडण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. त्याचवेळी बंगळुरूने पहिला सामना गमावल्यानंतर सलग तीन सामने जिंकले. आज संघ विजयाचा चौकार मारणार असल्याचेही काहीजण बोलले जात आहे.
आरसीबीने आतापर्यंत सर्वच विभागात चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात विराट कोहलीच्या 48 धावांच्या खेळीनंतर संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर सलामीवीर अनुज रावत फॉर्ममध्ये आला. कर्णधार फाफ डू प्लेसिसही धावा करत आहे. आरसीबीच्या टॉप ऑर्डरचे तीनही फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर दिनेश कार्तिकही आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे.
दुसरीकडे, धोनी आणि जडेजा व्यतिरिक्त रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू आणि ड्वेन ब्राव्हो सारख्या क्रिकेटपटूंना या संकटाच्या वेळी अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. CSK ने आतापर्यंत एका सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत पण उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्यांचे फलंदाज खेळलेले नाहीत. त्यांना आता आरसीबीच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करावा लागेल ज्यात फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली आणि मोहम्मद सिराज या गोलंदाजांचा समावेश आहे.