Sunday, February 23, 2025
Homeजरा हटकेका साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस? जाणून घ्या या काही खास...

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस? जाणून घ्या या काही खास गोष्टी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस मजुरांच्या कर्तृत्वाला आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा साजरा केला जातो. असे अनेक देश आहेत जिथे या दिवशी सुट्टी ठेवली जाते. या निमित्ताने कामगार दिनाची (International Labour Day) सुरुवात कशी आणि का झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा करतो याविषयी सांगणार आहोत.



कामगार दिनाची सुरुवात कशी झाली?
या दिवसाची सुरुवात 135 वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका आंदोलनातून (Worker Agitation in America) झाली. या आंदोलनात कामासाठी 8 तास निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी अमेरिकेतील अनेक कामगार सहभागी झाले होते. त्यापूर्वी कामगारांचे मोठ्याप्रमाणात शोषण केले जात होते. कामगारांकडून दिवसातील सुमारे 15 तासांपर्यंत काम करुन घेतले जात होते. शारीरिक श्रम शोषणाच्या विरोधात सर्व कामगार आणि मजुरांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. याविरोधात 1 मे 1886 साली सर्व कामगार आणि मजूर पहिल्यांदाच एकत्र येत रस्त्यावर उतरले. कारखानदार आणि सरकारविरोधात कामगारांचे आंदोलन सुरु होते. त्यांनी फक्त 8 तासांची ड्युटी आणि पगारी रजेची मागणी केली.

या आंदोलनादरम्यान रस्त्यावर उतरुन कामगार घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात काही मजुरांना आपला जीव देखील गमावावा लागला, तर 100 हून अधिक कामगार जखमी झाले होते. 889मध्ये आंतरराष्ट्रीय समजावादी संमेलनाची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांकडून 8 तासांपेक्षा जास्त काम करुन न घेणे आणि 1 मे हा दिवस आंरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच दरवर्षी 1 मे रोजी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -