जवळपास 350 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ घट मांडणीचे भाकीत आज म्हणजेच 4 मे रोजी जाहीर करण्यात आले भेंडवळ घट मांडणीनुसार, यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. यासह देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.
काय आहे या वर्षाची भविष्यवाणी
या घट मंडणीत गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करुन भाकीत माडण्यात येते. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यातसाधारण पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईल विशेष म्हणजे अवकाळी पाऊस देखील होईल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे असं वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत केले आहे. यासह मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील. तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील. तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील.
कोरोनासारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचे भाकीत करण्यात आले आहे. यासह देशात सत्ता पालट होणार नाही, देशाच्या राज्याची गादी कायम राहणार आहे. देशात आर्थिक अडचण निर्माण होईल असे भाकीत देखील यावेळी करण्यात आले.
350 वर्षांची परंपरा
राज्यभरातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचे लक्षलागून असलेल्या भेंडवडच्या घट मांडणीचे भाकित अखेर आज बुधवारी जाहीर झाले. 350 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा या भेंडवळच्या भविष्यवाणीला आहे. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनीही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढेचालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी यंदाचे हे भाकित व्यक्तकेलं आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं.