ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतातील अनेक युजर्सना इन्स्टाग्राम वापरण्यात अडचणी (Instagram Down) येत असून इन्स्टाग्राम डाऊन असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहेत.
अशा प्रकारचे आऊटेज ट्रॅकिंगसाठी DownDetector ही साईट वापरली जाते. देशातील अनेक युजर्सनी या साईटवरून इन्स्टाग्राम डाऊन असल्याची तक्रार केलेली आहे. सध्या इन्स्टाग्राम अॅक्सेस करण्यात अडचणी येत आहेत. काही युजर्सनी ट्विटरवरही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ही समस्या सर्व्हरशी संबंधित असण्याची शक्यता असून काही युजर्सना मात्र इन्स्टाग्राम नीट वापरता येत आहे.
इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर #instagramdown ट्रेंड सुरु झाला आहे.