Friday, July 25, 2025
Homeजरा हटकेसंक्रमण : गे सेक्समुळे मंकीपॉक्स पसरत असल्याचा दावा

संक्रमण : गे सेक्समुळे मंकीपॉक्स पसरत असल्याचा दावा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : जगभरातील 15 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 100 हून अधिक रुग्ण आढळल्यानंतर गे सेक्समुळे मंकीपॉक्स पसरत असल्याशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. युरोपमध्ये असा एक मोठा इव्हेंट झाला होता. त्यातून समलैंगिक पुरुषांमध्ये मंकीपॉक्सचे संक्रमण वेगाने पसरल्याचा दावा करण्यात आला आहे.



संघटनेचे सल्लागार डॉ. डेव्हिड हेमॅन यांनी म्हटले आहे की, स्पेन आणि बेल्जियममध्ये झालेल्या दोन रेव्ह पार्थ्यांमुळे समलैंगिक पुरुषांत मंकीपॉक्सचे संक्रमण झालेले असू शकते. रेव्ह पार्थ्यांत नाच-गाणी, ड्रग्ज, शारीरिक संबंध होत असतात. दरम्यान, स्पेनची राजधानी माद्रिदमधील वरिष्ठ आरोग्याधिकारी एनरीक एस्कुडेरो यांच्या मते, नुकत्याच झालेल्या एका गे प्राईड इव्हेंटनंतर येथे मंकीपॉक्सचे 30 रुग्ण आढळले आहेत.

या इव्हेंटला किमान 80 हजार लोक उपस्थित होते. त्यामुळे यातील सहसंबंध तपासले जात आहेत. दरम्यान, अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्नाने मंकीपॉक्सवरील लसीसाठी प्री क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -