Saturday, July 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : टाकळीवाडीत मंदिराच्या वास्तुशांतीत विधवा महिलांना दिला पूजेचा मान

कोल्हापूर : टाकळीवाडीत मंदिराच्या वास्तुशांतीत विधवा महिलांना दिला पूजेचा मान

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कुरुंदवाड ; टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे ताईबाई मंदिराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमात देवीच्या ओटी भरणी व विधिवत पूजा करण्याचा मान विधवा महिलांना देण्यात आला. शोभा विठ्ठल निर्मळे, चंदाबाई आप्पासाहेब निर्मळे, रेशमा बजरंग निर्मळे आणि सरिता विलास निर्मळे या विधवा भगिनींनी ताई बाईची ओटी भरून पूजा-अर्चा केली.


या उपक्रमाची ग्रामपंचायतीने दखल घेऊन विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी 10 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. लवकरच विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामपंचायत करणार असल्याची घोषणा ग्रा. स तुकाराम चिगरे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -