ताजी बातमी ऑनलाईन टीम
ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लोक केवळ ऐश्वर्याच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रशंसा करत नाहीत तर तिच्या स्टाईल स्टेटमेंटची चाहत्यांनी खूप प्रशंसा केली. अलीकडेच एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन क्वीनसारखी दिसत आहे.
ऐश्वर्याच्या स्टाइलचं कौतुक करताना थकत नाहीयेत. त्याचबरोबर या कार्यक्रमात असं काही घडलं जे कॅमेऱ्यातही कैद झालं, हे पाहिल्यानंतर चाहते ऐश्वर्यावर फिदा झाले आहेत.
ऐश्वर्याचा लेटेस्ट लूक चर्चेत ऐश्वर्या राय बच्चनने यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचं सौंदर्य आणि शैली दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याचबरोबर, आयफा अवॉर्डमध्ये जाण्याआधी ती मुंबईत आयोजित एका कार्यक्रमाचा भाग बनली होती. जिथे ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची लांबलचक रांग पाहायला मिळाली. त्याचबरोबर चाहत्यांचं तिच्यावरील प्रेम पाहून ऐश्वर्याही चाहत्यांचे आभार मानताना थकत नाही. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत
आहे.