Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी काळा ओढा लवकरात लवकर साफ करावा; अन्यथा तीव्र आंदोलन

इचलकरंजी काळा ओढा लवकरात लवकर साफ करावा; अन्यथा तीव्र आंदोलन

ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी शहरातील युवक काँग्रेसच्या वतीने काळा ओढा साफ करावा या मागणीसाठी मुख्याधिकार प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले इचलकरंजी शहरातील पावसाळ्यापूर्वी काळा ओढ – महासत्ता चौक ते आमराई रोड वरील काळ्या ओढयाची स्वच्छता करावे या मागणीसाठी नगरपालिका प्रशासनाला दिले निवेदन इचलकरंजी शहर युवक काँग्रेसच्या वतीने नगरपालिका प्रशासनासमोर निदर्शने करण्यात आली , शहराच्या मध्यवर्ती भागात महासत्ता चौक ते आमराई रोड येथील काळ्या ओठ्याची स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे . सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे .


सदर ओढया मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून , आपल्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी व् लोकप्रतिनिधीनी अनेक वेळा निवेदन दिलेले आहे . आपण त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून लक्ष घालणे गरजेचे आहे . आता पावसाळ्याची सुरुवात होत असताना सदर ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून , त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे . भागामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे .


यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे . तेव्हा आपण नगरपालिका प्रशासनाने काळा ओढ्याची स्वच्छता लवकरात लवकर सुरुवात करावी . अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहोत या आंदोलनात प्रमोद बाळासो खुडे युवक शेखर पाटील राज शेख फिरोज जमादार संतोष माळी आदीजण उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -