Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रबलात्काराच्या दोन घटनांनी शहर हादरल, आजोबांकडून नातीचा लैंगिक छळ तर मित्रानेच…

बलात्काराच्या दोन घटनांनी शहर हादरल, आजोबांकडून नातीचा लैंगिक छळ तर मित्रानेच…

अल्पवयीन दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांनी राज्याची उपराजधानी नागपूर शहर हादरले आहे. आजोबा आणि नात आणि मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना नागपूरमध्ये उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत नराधम आजोबाने अल्पवयीन नातीचा लैंगिक छळ केला आहे तर दुसऱ्या घटनेत मैत्रानेच आपल्या मैत्रिणीला वासनेची शिकार केली आहे. या दोन्ही प्रकरण वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजोबांकडूनच नातीवर अत्याचार…
शहरातील कपिलनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम आजोबानेच आपल्या नातीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. पीडित मुलगी 13 वर्षाची आहे. ती तिच्या आईसोबत आजोबाकडे आली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई गरोदर असल्याने ती माहेरी आली होती. पीडित मुलगी रात्री आजोबांकडे झोपात होती. परंतु आजोबामधील सैतान जागा झाला. त्याने आपल्या नातेला वासनेची शिकार केली. धक्कदायक म्हणजे पीडित मुलीच्या आईने तिचे वडील आणि मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने पीडितेच्या आईला घरातील सगळ्यांनी गप्प बसवले. तिने हा विषय कुटुंबात सोडवण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा प्रकार खूप गंभीर असल्यानंतर अखेर पीडितेने आणि तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. कपिलनगर पोलिस स्टेशनमध्ये पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम आजोबाविरोधात पॉक्सो आणि भादंवि कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाची दुसरी घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका 24 वर्षीय तरुणाने 12 वर्षीय मुलीला मैत्रीचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मनीष लिंबाळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपी एक सरकारी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी आणि पीडित मुलगी एकाच वस्तीत राहातात. आरोपीने पीडितेसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या माध्यमातून मैत्री केली होती. चॅटिंगच्या माध्यमातून आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दरम्यान, मनीषने पीडितेला त्याच्या घरी बोलावले. नंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकंच नाहीतर कोणाला काही सांगू नको, असेही बजावले. पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडिता या प्रकारामुळे प्रचंड घाबरली होती. परंतु, मोठी हिंमत करून तिने झालेला सगळा प्रकार आईच्या कानावर टाकला. अखेर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -