Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरनिवडणूकीपूर्वी शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता? रामदास आठवले

निवडणूकीपूर्वी शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता? रामदास आठवले

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik)निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.
राज्यसभेची निवडणूक भाजपाने जिंकली तर महाविकास आघाडीला चांगलाच धडा शिकवणार. निवडणूकीपूर्वी शिवसेनेची काही मते फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी हॉटेल बदलले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी दिली.

राज्यसभा निवडणूकीसाठी नेतेमंडळींच्या गाठीभेटी सुरु आहेत. दरम्यान आज त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यसभेसाठी रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. त्यातच आज या दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

चंद्रकांत पाटलांशी झालेल्या चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले, आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ‘आरपीआय’ला जागा मिळाल्या पाहिजे यावर चर्चा झाली. धनंजय महाडिक निवडून यावे त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या पाच आमदारांना भाजपसोबत यायला काहीच हरकत नाही असेही ते म्हणाले.

मविआने आमदार फुटू नये म्हणून त्यांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली. पण आमदार बदलले असल्याने शिवसेनेनं हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीपूर्वी शिवसेनेची काही मते फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -