देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्या येत्या जुलैपासून वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत घोषणा करू शकते. डीएची घोषणा वर्षभरात जानेवारी आणि जुलैमध्ये अशी दोनदा केली जाते. महागाईचा दरात वाढ झाल्यामुळे सरकार जुलै 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.
महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत सरकार दरवर्षी मार्च किंवा सप्टेंबर महिन्यात केली निर्णय घेत असते. दरम्यान, 31 डिसेंबर, 2019 नंतर दीड वर्षांपर्यंत म्हणजेच कोरोना महामारीच्या काळात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली नव्हती. अर्थ मंत्रालयाने कोरोनाच्या काळात म्हणजे जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यातील वाढ रोखली होती. त्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ देणे सुरू केले होते.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2021 मध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये महागाई भत्त्यात पुन्हा तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. वाढीव रक्कम 1 जुलै 2021 पासून कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 1 जुलै 2021 पासून 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जानेवारी, 2022 रोजी तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. आता सध्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के भत्ता मिळत आहे. महागाईचा दर वाढल्याने केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात येत्या 1 जुलैपासून पुन्हा वाढ होऊ शकते.
18000 रुपयांच्या मूळ वेतनावर महागाई भत्त्यात 540 रुपये वाढ होईल. तर तुमचे मूळ वेतन 25000 रुपये आहे तर त्यावर तुम्हाला 750 रुपये वाढीव महागाई भत्ता मिळू शकते. परंतु तुमचे मूळ वेतन 50000 आहे तर तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना डिए मिळू शकतो.