Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दोन किलो गांजासह दोघांना पकडले

कोल्हापूर : दोन किलो गांजासह दोघांना पकडले

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून गांजा खरेदी व विक्रीसाठी आलेल्या दोघा आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सुमारे दोन किलो वजनाच्या गांजासह एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, याबाबत कागल पोलिस अनभिज्ञ होते.
कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांना कागल येथे शुक्रवारी गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक गोरले, उपनिरीक्षक महेश मोर यांच्या पथकाने राजाराम तलाव परिसरात सापळा लावला.

यावेळी शुभम तानाजी सनगर (वय 19, रा. बेघर वसाहत, कागल) व अमोल मारुती शिंदेवड (वय 22, रा. वडवाडी माळभाग, कागल) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील सुमारे 40 हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजासह 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -