ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : पुण्यात राहणाऱ्या स्वरानं ऑनलाईनं किराणा सामान मागवलं. डिलीवरी बॉयनं सामान दिल्यानंतर, पैसे देण्यासाठी एक क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सांगितलं. स्कॅन केल्यानंतर एक लिंक जनरेट झाली. लिंकवर क्लिक केलानंतर नित पालन करत पेमेंट पूर्ण केलं. मात्र, थोड्यावेळानंतर तिच्या खात्यातून पैसे डेबिट होत असल्याचे मेसेज आले. काही वेळातच तिच्या खात्यातील रक्कम शून्य झाली. ही घटना फक्त स्वरापुरताच मर्यादित नाही. वर्तमानपत्रात क्यू आर कोडचा गैरवापर करून फसवल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, खरंच क्यूआर कोडमध्ये एवढी जोखिम आहे का ? QR कोडचा वापर करू नये का? अशा प्रकारची फसवणूक कशी टाळता येईल? असे अनेक प्रश्न निर्माण होतायेत. चला तर मग यासंदर्भात माहिती घेऊयात. सुरुवातीला क्यूआर कोड म्हणजे नक्की काय आहे हे पाहूयात.
कशा प्रकारे फसवणूक होते?
मुळात प्रत्येक क्यूआर कोडच्या मागे एक URL लपलेला असतो. त्याद्वारे तुम्हाला एका साईटवर रिडायरेक्ट केलं जातं. साईटवर एखाद्या ठिकाणी क्लिक करायला सांगितलं जातं. असं केल्यामुळे तुमच्या बँक खात्यांची माहिती संबंधित व्यक्तीकडे पोहोचते. पैसे देण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात येतो. तुमच्याकडे असलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून पैसे देण्यात येतात. फसवणुकीच्या प्रकरणात तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळतील,असं सांगितलं जातं. तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करताच तुमच्या खात्यातून पैसे कमी होतात.