ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : गेल्या 10 ते 12 दिवसांतील राजकीय नाट्यानंतर आता चित्र स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, या निवडीनंतर राजक क्षेत्रात ओढावलेली परस्थिती आणि शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेचा उहापोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. शिवाय नाराज आमदारांची भूमिका ही स्पष्ट होती. त्यामुळेच सत्तेत असतानाही त्यांनी माझ्यासोबत येण्याची तयारी दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात घडेलेल्या राजकीय घडामोडी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. कारण एकीकडे देशाचे नेते होते तर दुसरीकडे बाळासाहेबांचे शिवसैनिक असे म्हणत आपल्या पहिल्याच मनोगतामध्ये त्यांनी अप्रत्यक्ष खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची वर्णी लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोगत व्यक्त करताना अनेक
50 आमदारांमुळेच सर्वकाही शक्य
सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वकाही केले जाते. पण 50 आमदारांनी सत्तेच्या मागे न जाता भविष्याचा आणि जनतेच्या विकासाचा ध्यास घेत मला साथ दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 50 आमदार ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच हे शक्य झाला आहे. इतरवेळी सत्तेत स्थान मिळावे म्हणून पक्षांतर होत असेल पण यावेळी सत्तेतून बाहेर पडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास टाकला म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या आमदारांचे कौतुक केले. राज्यातील राजकारण हे सर्वांना ज्ञात असताना त्यांनी हे पाऊल उचलल्यानेच आजचे परिवर्तन झाल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.