Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानडिजिटल पेमेंट झालं आणखी सोप्पं.. व्यापाऱ्यांचाही होणार मोठा फायदा..!!

डिजिटल पेमेंट झालं आणखी सोप्पं.. व्यापाऱ्यांचाही होणार मोठा फायदा..!!

सध्या ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यासाठी ‘यूपीआय’ प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेक कंपन्यांनी ‘युपीआय’ अ‍ॅप्स (UPI Apps) लाँच केले आहेत. डिजिटायझेशनमुळे पेमेंट सुविधा पूर्वीपेक्षा खूपच सोपी झाली आहे..

दुकान लहान असो वा मोठे, प्रत्येक ठिकाणी आता ‘क्यूआर’ कोडचा कागद पाहायला मिळतो. त्यामुळे खिशात पैसे असो वा नसो, ‘क्यूआर’ कोड स्कॅन करुन खरेदी करता येते. मॉलपासून ते रस्त्यावरील पाणीपुरीच्या गाडीपर्यंत ‘क्यूआर’ (QR code) पेमेंट सुविधा उपलब्ध झालेली आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने बदल होत असतात. ‘क्यूआर’ कोडमुळे आजही अनेकांचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता ही अडचणही दूर होणार आहे. आता डिजिटल पेमेंटमध्ये आमुलाग्र बदल होणार आहेत. ‘क्यूआर’ काेड आता नव्या वैशिष्ट्यांसह येत आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

फोटो क्यूआर कोडबाबत..
सध्याच्या क्यूआर कोडमधून काहीच लक्षात येत नाही.. मात्र, आता त्यात बदल होणार असून, आता ‘फोटो क्यूआर कोड’ (Photo QR) येणार आहे.. सामान्य ‘क्यूआर’ची नवी व सुधारित आवृत्ती म्हणजे ‘फोटो क्यूआर’.. ‘पेटीएम’कडून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.. ‘पेटीएम’चे (Paytm) हे सर्वात अद्वितीय व सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक मानले जात आहे.

सध्या 20 लाखांहून अधिक व्यावसायिक ‘फोटो क्यूआर’चा वापर करीत आहेत. व्यावसायिकांना त्यांच्या आवडीनुसार ‘क्यूआर’मध्ये त्यांच्या आवडीचा फोटो जोडता येणार आहे.. दुकानाचे नाव, फोन नंबरही ‘फोटो क्यूआर’मध्ये समाविष्ट करता येणार आहे. तुमचा व्यवसाय ग्राहकांशी जोडण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

व्यापाऱ्याला त्याचा आवडता फोटो वापरून स्वत:चा फोटो क्यूआर तयार करावा लागतो. त्यानंतर त्याची डिजिटल प्रत डाउनलोड करावी लागते. हा ‘क्यूआर’ तो ग्राहकांसोबत शेअर करू शकताे. ती डिजिटल कॉपी स्कॅन करून ग्राहकांना पेमेंट करता येते. शिवाय स्टिकर्स, फोटो क्यूआर स्टँडही तयार करता येते.

फोटो क्यूआरचे फायदे

फोटो क्यूआर पेमेंट पद्धतीमुळे व्यवसायाला पर्सनल टच देता येतो. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ग्राहकही पूर्णपणे समाधानी होतात. योग्य क्यूआर कोडवर पैसे भरले की नाही, याबाबत ग्राहकांच्या मनातही शंका राहत नाही.

असा तयार करा फोटो क्यूआर..

फोटो क्यूआर तयार करण्यासाठी ‘पेटीएम फॉर बिझनेस’ अ‍ॅप ओपन करा. होमपेजवर दिसणार्‍या ‘फोटो क्यूआर’ आयकॉनवर क्लिक करा.

क्यूआरमध्ये जोडण्यासाठी फोटो निवडा. तुमचा आवडता फोटो ‘पेज कस्टमाइझ करा’ विभागात निवडा. त्यातून तुमचे आवडता फोटो निवडा आणि पुढील चरणावर जा.

फोटो निवडल्यानंतर पत्ता भरणे आवश्यक आहे. नंतर, ‘फोटो क्यूआर’ ऑर्डर करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

पेमेंट झाल्यावर फोटो क्यूआर ऑर्डर दिली जाते. ‘पेटीएम बिझनेस’ अ‍ॅपवर तुम्ही ऑर्डर तपासू शकता.

बिझनेस वाढवण्यासाठी ‘फोटो क्यूआर’ ही देखील एक चांगली सुविधा आहे आणि तुम्हाला यात कोणतीही अडचण येणार नाही, हे नक्की..!!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -