ताजी बातमी ऑनलाईन टीम
कुरुंदवाड शहर हे पुरोगामी विचारांचे शहर म्हणून परिचित आहे. माणसाने देह सोडला असला तरी तो विचाराने तो जिवंत असतो. या विचारांची शहरात खूप मोठी मांदियाळी आहे. याच विचारांची मनाशी खुणगाठ बांधून एक धाडसी निर्णय कुरुंदवाड येथील बाहुबली जिवाजे यांनी घेतला. ऐन उमेदीच्या काळात आपल्या पत्नीचे अपघाती निधन झाले. पण अशा परिस्थितीत नाउमेद न राहता पत्नीचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपली सौभाग्यवती अवयवाच्या रूपाने या पृथ्वीस्थळावर रहावी हा दृष्टिकोन त्यांनी बाळगला. याच दृष्टिकोनातून त्यांनी पत्नीचे अवयव दान केले.
पत्नीची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर निष्फळ ठरली. तीने देह सोडल्यानंतर अवयवाच्या रूपाने या जगात ती रहावी या हेतूने जिवाजे कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण जगासमोर एक आदर्श ठरला आहे.