Wednesday, December 17, 2025
Homeराजकीय घडामोडीदसरा मेळाव्याआधीच ठाकरी तोफ धडाडणार! शिंदे गटाच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर...

दसरा मेळाव्याआधीच ठाकरी तोफ धडाडणार! शिंदे गटाच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

शिवसेनेतील बंडखोरीमुळे पक्षात दोन गट पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील गट आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान आता दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) दोन्ही गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena’s Dussehra Melava) यंदा कोण घेणार याबाबात सध्या तरी संभ्रम आहे. शिंदे गटाला आधी अर्ज केल्याने एमएमआरडीएने बीकेसी मैदानावर (BKC Ground) मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु ठाकरे गटला अद्याप परवागनी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान दसरा मेळाव्याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ठाकरी तोफ धडाडणार आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभेला (Uddhav Thackeray’s public meeting) संबोधित करणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभर घुमेल असा हा मेळावा असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील एक तृतियांशहून अधिक आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे आणि हा गट आता भाजपसोबत सत्तेत आहे. शिंदे गट आणि भाजप बीएमसीच्या निवडणूका एकत्र लढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे असलेले बीएमसीची सत्ता कायम राखण्याचं आव्हान तेवढं सोपं नाही. उद्धव ठाकरेंना आता भाजप, मनसे यांच्यासह आता शिंदे गटाचा देखील सामना करावा लागणार आहे. यामुळे पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा संपर्क वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर व्यासपिठावरून संवाद साधणार असल्याने ते या भाषणात काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई आणि राज्यातील शिवसैनिकांना सकारात्मक संदेश देण्याचा आणि त्यांच्या बळ निर्माण करण्याचा शिवेसेनाचा प्रयत्न असेल. या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपही निशाण्यावर असण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -