मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4 विकेट्सने पराभूत करून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सुरुवातील कॅमरुन ग्रीनची 30 चेंडूत धडाकेबाज अर्धशतकी (61) खेळी आणि शेवटी मॅथ्यू वेडने खेळली मॅच फिनिशींग खेळी यामुळे ऑस्ट्रेलियाने (India vs Australia, 1st T20I) या सामन्यात बाजी मारली. कॅमरुन ग्रीनने त्याच्या खेळीत फक्त 30 चेंडूंच्या डावात (Ind vs Aus T20 series) 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशकत ठोकले, तर मॅथ्यू वेडने 7 व्या क्रमांकावर 21 चेंडूत नाबाद 45 धावांची खेळी केली. या डावात वेडने 6 चौकार आणि 2 षटकार खेचले.
भारतीय गोलंदाजीत अक्षर पटेल वगळता भारताचा एकही गोलंदाज या सामन्यात आपला प्रभाव सोडू शकला नाही. अक्षरने 4 षटकात केवळ 17 धावा देत कांगारूंचे 3 बळी घेतले. मात्र इतर गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखता आली नाही. कॅमरुन ग्रीन, अॅरोन फिंच आणि मॅथ्यू वेड यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावार ऑस्ट्रेलियाने हा सामना 4 विकेट राखून जिंकला.
कॅमेरून ग्रीन-मॅथ्यू वेडची धडाकेबाज खेळी, ऑस्ट्रेलियाची भारतावर 4 विकेट्सने मात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -








