ताजी बातमी ऑनलाईन टीम
आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे असे म्हटले जाते. बाळाला जन्म देताना वेदना होत असल्या तरीही मातृत्त्वाची भावना ही आनंददायी असते. मात्र सध्याच्या काळात आई होताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्भपाताची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. गोड बातमी मिळाल्यावर महिला खूप आनंदी असतात. मात्र दुर्दैवाने अनेकींना गर्भपाताचा सामना करावा लागतो. तर काही जणी या विशिष्ठ कारणांमुळे गर्भपात करत असतात. अशा वेळी महिला शारीरिक आणि मानसिकरित्या खूप कमकुवत झालेल्या असतात. ब्लीडींग जास्त झाल्याने महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात आयरनची कमतरता निर्माण होते. यामुळे एनीमियाची समस्या निर्माण होऊ शकते. वारंवार चक्कर येणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलांचा आहार (abortion Diet)त्यांचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करु शकतो. गर्भपात झाल्यानंतर महिलांचा आहार कसा असावा याविषयीच्या काही खास टीप्स आपण आज जाणून घेणार आहोत…
कॅल्शियमयुक्त आहार
गर्भपातानंतर कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यासाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स, सीफूड्स, दूध , डेयरी प्रोडक्ट्स आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करु शकता.
शरीर हायड्रेट ठेवा
गर्भपातानंतर अनेक महिलांना उल्टी आणि मळमळ सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पचनासंबंधीत समस्या होतात. शरीरातील हार्मोनल चेंजेंसमुळे या समस्या होतात. अशा वेळी महिलांना घूाबरु नये. या काळात भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेट ठेवावे. या काळात तुम्ही विविध सूप आणि पेय आहारात समाविष्ट करु शकता.
फॉलिक अॅसिड
मानसिक तणावर आणइ रेड सेल्स विकासात फॉलिक अॅसिड खूप फायदेशीर असते. यामुळे अॅनिमिया सारख्या समस्या देखील दूर होतात. यामुळे गर्भपातानंतर तुम्ही फॉलक अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन अवश्य करावे. यासाठी तुम्हाला एवोकाडो, बदाम आणि अक्रोड हे पदार्थ डायटमध्ये समाविष्ट करावे लागतील.
आवडीचे पदार्थ खावेत
शरीरासोबतच मनाला आनंद देण्यासाठी आवडत्या पदार्थांचे सेवन करा. या काळात स्वतःचे आरोग्य सुधारण्यासाठी हेल्दी पदार्थांसोबतच कधी-कधी आपल्या आवडीच्या पदार्थांचे सेवन अवश्य करावे. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहिल.