Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दिवे, पणत्यांनी बाजारपेठा उजळल्या

कोल्हापूर : दिवे, पणत्यांनी बाजारपेठा उजळल्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अमंगल अंधाराला दूर सारत सर्वांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व घेऊन येणारा सण म्हणजे दीपावली. प्रकाशाचा उत्सव असणार्‍या या सणामध्ये पणतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध असल्या तरी पारंपरिक लाल मातीच्या दिव्यांनी घर, अंगण उजळून निघणार आहे.



तेजोमय प्रकाशाच्या दिवाळी सणासाठी आतापासूनच आवश्यक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. पापाची तिकटी, कुंभार गल्ली, महाद्वार रोड, खरी कॉर्नर, बाजारगेट, जोतिबा रोड, राजारामपुरी अशा प्रमुख मार्गांवरील स्टॉलसह शहरातील विविध मॉल्समध्ये विविध आकार आणि प्रकारातील पणत्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

सणानिमित्त गुजरात आणि राजस्थानातील खास लाल आणि चिनी मातीतील पणत्यांसह नक्षीकाम केलेल्या दिव्यांनी बाजारपेठ उजळली आहे. पणत्या, नंदादीप, दीपमाळांनी बाजारपेठ सजली असून, यंदा फॅन्सी दिवे आणि नक्षीकाम असलेल्या पणत्यांना मोठी मागणी आहे. लामणदिवे, मातीचे आकाशकंदील व रंगीत दीपमाळा बाजारात दिसत आहेत. गणपती, उंट, गुलाब फुलांच्या आकारातील पणती, डोम पणती, कटिंग दीपमाळ, पाण्यावर तरंगणार्‍या पणत्या आदींचा समावेश आहे. वॉल हँगिंग दिवे आणि काचेच्या दिव्यांनाही पसंती मिळत आहे. अगदी पाच रुपये नगापासून ते शंभर, दीडशे रुपये नगापर्यंत या पणत्यांची किंमत आहे.

थ्री डी पणत्यांची क्रेझ

बाजारात थ्री डी पणत्यांची क्रेझ यंदाही कायम असल्याचे दिसून येत आहे. बहुरंगी परावर्तित या पणत्यांमुळे वेगवेगळ्या रंगांची उधळण करता येणार आहे. या पणत्यांचे वैशिष्ट म्हणजे ज्या रंगाची पणती त्याच रंगातील डिझाईनची सावली पडून जमीन उजळून निघते. याशिवाय 12 पणत्या, 12 कापूस वाती आणि 12 होल्डरच्या बॉक्समध्ये या पणत्या खरेदी करता येतात.

तेलाशिवाय पेटणार पणती

सध्या बाजारात पाण्यावर जळणार्‍या दिव्यांची चलती आहे. या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त पाण्याने जळतात, ज्याला कोणत्याही प्रकारचे तेल किंवा वीज लागत नाही. या दिव्यांमध्ये लहान सेल बसवलेले असून सेन्सरने दिवा जोडलेला आहे. हे दिवे पाण्याच्या संपर्कात येताच ते तेजस्वीपणे जळू लागतात.फुलांचा आकार असलेले हे दिवे दिसायलाही खूप सुंदरअसून त्यांची किंमत 40 ते 70 रुपयांपर्यंत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -