ऐनदिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कोरोनाची (Coronavirus) समस्या कायम असताना नवे तीन विषाणूंचा (New Covid Variant) शिरकाव झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एक्सबीबी (XBB) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट राज्यात आढळून आला आहे. यामुळे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. यासह राज्यात बीए 2.3.30 आणि बीक्यू.1 हे नवे व्हेरिएंट देखील शिरकाव करत आहे.
आठवड्याच्या तुलनेत कोविड रुग्ण संख्येत 17.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठाणे, रायगड आणि मुंबई भागामध्ये ही वाढ अधिक आहे. दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि हिवाळ्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे. देशात कोविडचे नवनवीन व्हेरिएंट आढळून येत आहे. देशात नुकताच ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. XBB असे या नव्या व्हेरिएंटचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहे. Omicron चे इतर व्हेरिएंट Bf.7 आणि Ba.5.1.7 आहेत. ओमिक्रॉनच्या या संसर्गजन्य प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशात महाराष्ट्रात बीए. 2.75 चे प्रमाण 95 टक्के वरून 76 टक्क्यांवर आले आहे. नव्याने आढळून आलेला एक्सबीबी हा व्हेरिएंट सध्या राज्याची चिंता वाढवणारा ठरत आहे. हा व्हेरिएंट बीए.2.75 पेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे फ्ल्यू सारखा कोणताही आजार जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेत उपचार घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, देशातील तमिळनाडूमध्ये XBBचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहे. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये देखील या नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद करण्यात येत असून आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. या व्हॅरिएंटचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून उपायोजना करत आहे. तसेच नागरिकांना देखील याबाबत जागरूक केले जात आहे.
‘ही’ आहेत लक्षणे
दरम्यान, राज्यात नव्याने आढळून आलेला या व्हॅरिएंटची लागण झाल्यास सामान्यतः काही लक्षणे समोर आले आहे. यात ताप, घश्यात खवखव, थंडी वाजून येणे या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे ही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार घ्यावा.