बॉलिवूड एक्ट्रेस कृती सेनन ही सौंदर्य आणि फिटनेसमुळे (Fitness) कायम चर्चेत असते. कृती सेनन (Kriti Sanon) ही इंडियन असो या वेस्टर्न, प्रत्येत लूकमध्ये ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushman Khurana) यांनी नुकतंच त्याच्या घरी प्री दिवाळी बॅशचं (Pre Diwali Party) आयोजन केलं होतं. या पार्टीत कृती सेनन देखील उपस्थित होती. कृती ही साडी नेसून पार्टीत आली होती. पण, तिच्या ब्लाऊजवरच सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
कृती सेनन पार्टीत व्हाईट अँड गोल्डन साडी नेसून आली होती. तिने केस मोकळे सोडले होते. तिला पाहाताच पार्टीत आलेल्या प्रत्येकांच्या हृदयाची धडधड वाढली असावी. आता सोशल मीडियावर कृतीच्या लूकचीच चर्चा आहे. कृतीने साडीवर ट्यूब ब्लाऊजसोबत टीप अप केलं होतं. कृतीच्या ब्लाऊजनेच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
कृती साडी परिधान करून पार्टीत सहभागी झाली होती. वरवर पाहिलं तर कृतीनं ब्लाऊज घातलं नव्हतं असंच दिसत होतं. परंतु, तसं नाही. कृतीने ट्यूब ब्लाऊज परिधान केलं होतं. तिच्या ब्लाऊजवरच सगळ्यांचं लक्ष होतं. आता कृतीचा पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, कृती सेनन हिने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करून नुकतेच आठ वर्षे पूर्ण केले आहेत. कृतीने अल्पवधीत स्वतःला सिद्ध केलं आहे. आज तिचं नाव बॉलिवूडमधील टॉप तारकांमध्ये घेतलं जातं. कमिर्शियल हिट आणि जबरदस्त कंटेंटचं एक मजबूत कॉम्बिनेशन असल्याचं कृतीने दाखवून दिलं आहे. कृतीने ‘मिमी’ (Mimi) मध्ये केलेल्या शानदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. आयफा आणि फिल्मफेअर सारख्या पुरस्कारांची देखील कृती सेनन ही मानकरी ठरली होती.