Friday, July 4, 2025
Homeमनोरंजनसल्लूभाईला झाला डेंग्यू, करन करणार बिग बॉस होस्टिंग

सल्लूभाईला झाला डेंग्यू, करन करणार बिग बॉस होस्टिंग

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीव्ही वरील बिग बॉस कार्यक्रमाचे चाहते अनेक आहेत आणि त्यातही त्यांना सलमान खानला पाहणे अधिक आवडते. त्याच्यासाठी थोडी वाईट बातमी आहे. सल्लूभाई ला डेंग्यूची लागण झाली आहे आणि त्यामुळे त्याला डॉक्टरनी काही दिवस सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. परिणामी पुढचे काही आठवडे बिग बॉस मध्ये सलमान भाईचे दर्शन चाहत्यांना होणार नाही. सलमान सध्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाचे शुटींग सुद्धा करत होता मात्र तब्येत बिघडल्याने हे शुटींग सुद्धा रद्द केले गेले असल्याचे समजते.



बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्ट नुसार बिग बॉस १६ चे पुढचे काही एपिसोड दिग्दर्शक करन जोहर होस्ट करणार आहे. सलमानने स्वतः करनला फोन करून बिग बॉस १६ चे होस्टिंग करण्याची विनंती केली असून करणने त्याला होकार दिला आहे. करणला सलमान विषयी खूप आदर आहे हे त्यामागचे एक कारण आहे. करनला या साठी कलर्स कडून मोठी रक्कम दिली जाणार आहे असेही त्यामागे दुसरे कारण आहे.

करनने यापूर्वी बिग बॉस होस्ट केले आहे हा त्याचा प्लस पॉइंट आहे. सध्या हा शो रोमांचकारी पातळीवर असून हा शो हिट होण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व यंदाच्या सिझन मध्ये आहे असे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -