Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील फॅशन स्ट्रीटवर आगीचं थैमान! दुकानांमधील साहित्य जळून खाक

मुंबईतील फॅशन स्ट्रीटवर आगीचं थैमान! दुकानांमधील साहित्य जळून खाक

दक्षिण मुंबईतील शॉपिंग अव्हेन्यू फॅशन स्ट्रीटला शनिवारी दुपारी भीषण आग (Fashion street Fire) लागल्याची घटना घडली. ही आग दुपारी 1.02 वाजण्याच्या सुमारास लागल्याची (Massive Fire on Fashion Street in Mumba) माहिती आहे. बीएमसीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन (Fashion Street in Mumbai) विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीव नियंत्रण मिळवण्यात आले.

ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले हे देखील अद्याप समजले नाही. या प्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फॅशन स्ट्रीटमधील दुकानांना लागलेली आग लेव्हल 1 ची होती. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु या आगीत डझनभर दुकानं जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. एमएफबी, बीईएसटी, पोलीस आणि इतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -