Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी प्या 'मसाला चहा', होतील हे फायदे

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी प्या ‘मसाला चहा’, होतील हे फायदे

हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामात बुरशी आणि जीवाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या काळात (Winter Special Chai) अनेक प्रकारचे आजार देखील पसरतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता (Masala Tea Benefits) असते. यामुळे सर्दी, खोकला असे आजार या काळात मोठ्या प्रमाणात पसरतात. परंतु तुम्ही घरच्याघरी काही उपाय (Masala Chahache Fayde) करून या आजारांवर मात करू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच एक घरगुती उपाय (Home Remedy) सांगत आहोत. हा उपाय करून तुम्ही सर्दी, खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकतात.

चहा हे बहुतेक लोकांचे आवडते पेय आहे. हाच चहा तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम (cold and cough remedy) मिळवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मसाला चहा अतिशय फायदेशीर ठरतो. मसाला चहामुळे शरीराला इतरही अनेक फायदे होतात. मसाला चहा कोणत्याही सामान्य चहापेक्षा अधिक फायदेशीर असतो. हिवाळ्यात मसाला चहा तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. यासोबतच तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.

असा बनवा मसाला चहा
मसाला चायमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. त्यामुले हा चहा इतर सामान्य चहापेक्षा शरीराला अधिक फायदेशीर ठरतो. मसाला चहा बनण्यासाठी चहा पत्तीसोबतच, तुळशीची पाने, लवंग, आले, वेलची, दालचिनी बारीक करून त्याचे पावडर तयार केले जाते. हे मसाला पावडर चहात घातले जाते. हा मसाला चहा प्यायल्याने तुमचा थकवा दूर होतो आणि त्वरित ऊर्जा मिळते. हा चहा पिल्याने शरीरातील सर्व प्रकारची जळजळ कमी होते. तसेच मधुमेह असलेल्या लोकांनाही फायदा होतो.

मसाला चहाचे फायदे
मसाला चहामध्ये घातलेल्या दालचिनी आणि वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. या गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते आणि कॅन्सरशी लढण्याची क्षमताही वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा चहा रोज पिल्यास कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. याशिवाय हिवाळ्यात होण्याऱ्या सर्दी आणि खोकल्पासून देखील आराम मिळतो. या चहातील मसाल्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. त्यामुळे ताप असलेल्या व्यक्तीलाही हा चहा पिल्याने आराम मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -