डॉक्टराने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे वज्रचौडेच्या महिलेचा दुदैवी मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे तासगाव तालुक्यासह वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरच्या विरोधात तासगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, डॉक्टरांने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्यांनतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत उपचारातील हलगर्जीमुळे मृत्यू झाला असल्यामुळे या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कारण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्याप या डॉक्टर गुन्हा दाखल झालेला नाही.
तासगाव पोलीसात डॉक्टर विरोधात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, वज्रचौडे ता. तासगाव येथील संबधित महिलेला सर्दी व किरकोळ ताप आला म्हणून ३० ऑक्टोबर रोजी आपल्या गावाशेजारील गव्हाण ता. तासगाव येथील संबधित डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेली. डॉक्टरांनी त्या महिलेला इंजेक्शन व सलाईन लावले. परंतु काही वेळातच त्या महिलेच्या इंजेक्शन दिलेला हातावर फोड आले व हात मोठया प्रमाणात सुजला व या महिलेची तब्बेत गंभीर बनली. शरीर व हात निळसर पडला. यामुळे गोंधळलेल्या डॉक्टरांनी तिला सांगलीच्या खाजगी हॉस्पीटलमध्ये भरती करणेसाठी चिट्ठी दिली. तातडीने नातेवाईकांनी सदर महिलेला सांगली येथे हलविले परंतु नाजूक स्थिती झालेल्या या महिलेची गंभीर परिस्थिती पाहून या खाजगी हॉस्पिटलने या नातेवाईकांना सांगली सिव्हीलमध्ये भरती क्जण्यास सांगितले. यांनतर या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरानी तिला मृत घोषीत केले. यांनतर डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच हा मूत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, गव्हाण -अंजनी रोडला नव्यानेच दवाखाना थाटलेला हा डॉक्टर गरीबांचा मसीहा असलेची गावात चर्चा आहे. फक्त शंभर रूपयात उपचार अशी प्रसिध्दी ही त्याने मिळविली आहे. त्यामुळे या दवाखान्यामध्ये आसपासच्या खेडयातील सुमारे दररोज शंभर ते दोनशे रुग्णांचा राबता असलेची चर्चा आहे. पण अलीकडल्या दोन महिन्यात शंभर रुपये उपचाराचा दर पाचशे ते सहाशे रुपये केला आहे. कारण येईल त्या रुग्णाला सलाईनच लावली जाते त्यामुळेच ही दरवाढ झाली असलेची गावात चर्चा आहे. तर हा गुन्हा दाखल होणेसाठी नातेवाईक व विविध संघटना सक्रीय झाल्या असून तासगाव पोलीस कोणत्या अहवालाची वाट पहात आहे, असे नातेवाईक म्हणत आहेत.