Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यात आरोग्यासाठी संजीवनी ठरते संत्री, रोगप्रतिकार शक्तीही मजबूत करते

हिवाळ्यात आरोग्यासाठी संजीवनी ठरते संत्री, रोगप्रतिकार शक्तीही मजबूत करते

ताजी बातमी ऑनलाईन टीम


संत्री हे असे फळ आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. त्यामुळे संत्र्याला सुपरफूड म्हणतात. चवीला आंबट-गोड असलेली संत्री आरोग्याला लाभदायी ठरते. विशेषतः हिवाळ्यात रोज संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दीपासून संरक्षण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी संत्री रामबाण ठरते. जाणून घेऊया संत्रीच्या आरोग्य विषयक फायद्यांविषयी अधिक माहिती.



हिवाळ्यात आरोग्यविषयक काही समस्या निर्माण होतात. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. अशात खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील संत्री प्रभावी ठरते.



पचनशक्ती मजबूत होते
हिवाळ्यात रोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते. संत्र्यामध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. भूक कमी लागल्याने वजन नियंत्रणात राहते. यासह संत्र्याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज देखील कमी होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -