Sunday, August 3, 2025
HomeमनोरंजनMalaika Arora आणि Arjun Kapoor करणार लग्न?, अभिनेत्रीच्या 'मी होकार दिला' या...

Malaika Arora आणि Arjun Kapoor करणार लग्न?, अभिनेत्रीच्या ‘मी होकार दिला’ या पोस्टमुळे होतेय चर्चा!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर नेहमी चर्चेत असतात. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा अर्जुनला डेट करत आहे. दोघांनी एकमेकांप्रती असलेल्या नात्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. पण फोटो असो वा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्याचे एकमेकांवर असलेले प्रेम सर्वांना दिसून येते. तसंच ही जोडी सर्वांना प्रचंड आवडते. अशामध्ये मलायका आणि अर्जुन लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांचे चाहते नेहमी विचारत असतात. अशामध्ये मलायका अरोराने केलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये मलायका रोराने दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे.

मलायकानं नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक आऊटफिटमधील एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका लाजताना दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘मी होकार दिला.’ असे लिहिले आहे. अभिनेत्रीचे कॅप्शन वाचल्यानंतर मलायका अरोराने अर्जुन कपूरला लग्नासाठी होकार दिल्याचा अंदाज सर्वजण लावत आहे. अशामध्ये तिच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मलायकाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मलायकाच्या या पोस्टनंतर नेटिझन्सने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. मलायकाच्या या पोस्टमुळे त्यांच्या मनात आलेले प्रश्न त्यांनी तिला विचारले आहेत. एका नेटकऱ्याने या पोस्टला कमेंट करत ‘अर्जुन कपूरसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला का? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत ‘कशासाठी होकार दिला आहेस?’ असा सवाल केला आहे. मलायकाच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की मलायकाने लग्नाला होकार दिला की इतर कोणत्या गोष्टीसाठी होकार दिला. नेमकं काय ते त्यांना जाणून घ्यायचे आहे.

अशामध्ये मलायकाच्या पोस्टवर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत मलायकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शमिता शेट्टी, माही विज, तन्नाज इराणी आणि अदिती गोवित्रिका या कलाकारांनी मलायकाच्या पोस्टला कमेंट करुन मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -