Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगभोगावती नदीत आढळेली वस्तू डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न, जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात...

भोगावती नदीत आढळेली वस्तू डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न, जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात यश!

पेणजवळ संशयास्पद वस्तू (Suspicious Item) आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पेणजवळच्या भोगावती नदीच्या (Bhogavati River) पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या असलेली ही संशयास्पद वस्तू आढळून आली होती. पण आता ही संशयास्पद वस्तू डमी बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 4 तासांच्या प्रयत्नांनंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवी मुंबई (Navi Mumbai) आणि रायगडच्या (Raigad) बॉम्ब शोधक पथकाच्या (Bomb Squad) मदतीने हा बॉम्ब निकामी करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोगावती नदीवरील पुलाच्या खालील बाजूला पाण्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. नदीपात्रामध्ये गेलेल्या एका व्यक्तीला जिलेटिनच्या या कांड्या दिसून आल्या. त्याने तात्काळ ही माहिती रायगड पोलिसांना दिली. घटनेबाबत माहिती मिळताच रायगड पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या संशयास्पद वस्तूमुळे एकच खळबळ उडाली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई-गोवा हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

रायगड पोलिस अधिक्षक, रोहा आणि खालापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपास सुरु केला. त्याचसोबत जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यासाठी मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास जिलेटिनच्या कांड्या असलेली ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नदीपात्रामध्ये पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाने शोधकार्य सुरु होते.

चार तासांच्या अथक परिश्रमानंतर या सर्व जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्यात आल्या. त्यानंतर ही संशयास्पद वाटणारी वस्तू डमी बॉम्ब असल्याची माहिती समोर आली. ही बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण या घटनेमुळे पेणमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्या की कुणी टाकल्या याबाबतचा तपास सध्या रायगड पोलिसांकडून सुरु आहे. हा डमी बॉम्ब तयार करण्यासाठी जिलेटीनच्या कांड्याचा वापर करण्यात आला होता. त्याचसोबत या डमी बॉम्बमध्ये वायर आणि घडाळ्याचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -