शिवाजी पार्क येथील नक्षत्र हाईट्समध्ये चोरटय़ांनी धुमाकूळ घालत 4 बंद फ्लॅट फोडले. एकाच फ्लॅटमधील 13 तोळे सोन्याचे दागिने, रोख 55 हजार असा सुमारे 5 लाख रुपयांच्या मुद्देमालवर डल्ला मारला. याबाबतची फिर्याद धनाजीराव शामराव पाटील (वय 58 रा. शिवाजी पार्क नक्षत्र हाईट्स) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबतची माहिती अशी, शिक्षक असणारे धनाजीराव पाटील हे दिवाळी सुट्टी निमीत्त कुटूंबासह मंगळवारी सकाळी बाहेर गावी गेले होते.मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी धनाजी पाटील यांच्यासह परिसरातील अन्य 3 बंद फ्लॅट लक्ष केले.पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरटयांनी 45 ग्रॅमचे पेंडल, 50 ग्रॅमचे सोन्याचे तोडे,15 ग्रॅमचा नेकलेस,10 ग्रॅमच्या सोन्याच्या कुडय़ा,5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 5 ग्रॅमची सोन्याची रिंग, चांदीचा छल्ला,मोत्याची माळ,रोख 55 हजार रुपये असा सुमारे 5लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर त्याच मजल्यावर राहणारे सुनिल लक्ष्मणराव कित्तुर,जयवंत रामचंद्र गायकवाड, निर्मला चारुदत्त पाटील यांचे बंद फ्लॅटही चोरटय़ांनी लक्ष केले.त्यांच्याही फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला.