Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीआदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठा धक्का, बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश ; टायगर...

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठा धक्का, बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश ; टायगर ग्रुप चे सदस्य शिंदे गटात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश केला. मुंबईचे युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पुण्यातील कामगार विभागातील पदाधिकारी, भिवंडी, कल्याण, शहापूर, वाडा इथल्या ग्रामीण भागात पदाधिकारी यांनी शिंदे गटात भव्य प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.



अनिल परब यांच्या अंधेरी मतदार संघातही युवासेनेला मोठा धक्का बसला आहे. अंधेरी मतदार संघातील युवासेना शिंदे गटात सामील झाली आहे. युवा सेना विधानसभा समन्वयक योगराज अरुण गोसावी, टायगर ग्रुपचे रोमिओ राठोड यांच्यासह संपूर्ण टायगर ग्रुपचे सदस्य शिंदे गटात सामाील झाले आहेत.

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनीही आज शिंदे गटात प्रवेश केला. नुकताच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम आहेत. नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वडलांसोबत शिंदे गटात न जाता अमोल किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचंच ठरवलंय.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिंदे गटातील पक्षप्रवेशावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात इकडे तिकडे लोक येत जात असतात, आम्ही सर्व निष्ठावंत एकत्र लढणार आहोत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. वैजनाथ वाघमारे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर सुषमा अंधारे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही 4 ते 6 वर्ष विभक्त आहोत, यावर मला काहीच बोलायचं नाही असं अंधारे यांनी म्हटलंय.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -