Tuesday, August 5, 2025
Homeसांगलीपुण्यातील सोन्याचांदीच्या चोरीचे सांगली कनेक्शन

पुण्यातील सोन्याचांदीच्या चोरीचे सांगली कनेक्शन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घरमालकाच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या नोकर व दोन महिलांसह आठजणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. या आरोपींमध्ये तीन सराफ व्यावसायिकांचाही सहभाग उघड झाला असून, आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



चंदू बालाजी मेडेवाढ या नोकरासह इतर साथीदार सारिका आप्पासाहेब सावंत (रा. मुंढवा, पुणे, मु. रा. शेगाव, ता. जत, सांगली), भावना रविंद्र कोदे (रा. मुंढवा, पुणे), जनार्दन नारायण कांबळे (रा. शाहूनगर, सांगली), ऋषिकेश राजाराम तोरवे (रा. कोसारी, ता. जत, सांगली) व दुर्गाचरण रविंद्र कोदे (रा. कोंढवा, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधित चोरीची घटना 29 ऑक्टोबर रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी करण्यात आलेले सोने-चांदीचे दागिने हे सराफ प्रवीण पोपट दबडे, प्रतिम पोपट दबडे व त्यांचा साथीदार महेश महादेव भोसले ( सर्व रा. ढालगाव, ता. कवठे महांकाळ, सांगली) यांना विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सोनाराच्या ताब्यातून 22 लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -